भोकर: (रमेश गंगासागरे )  तालुक्यातील हाळदा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिनांक १५ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ पर्यंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या बीज प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व किर्तन सोहळा संपन्न होत असून या सप्ताहात दुपारी १२ ते ४ लहरी बाबा संस्थान श्रीक्षेत्र मधापुरी अकोला येथील प्रमुख परमपूज्य बाल योगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीराम कथा ऐकावयास मिळणार आहे.
  या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम. सकाळी ४ ते ६ काकडा भजन,७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते ४ श्रीराम कथा ज्ञानयज्ञ, सायंकाळी ६ ते ७:३० हरिपाठ व रात्री ८:३० ते ११ खालील मान्यवर संतांची हरिकीर्तन होणार आहेत. दिनांक १५ मार्च रोजी शुक्रवार ह भ प तुकाराम महाराज नांदेडकर, १६ मार्च हभप व्यंकटेश महाराज कामारीकर, १७ मार्च ह भ प पंजाब महाराज चालगनीकर, १८ मार्च ह भ प एकनाथ महाराज आळंदीकर, १९ मार्च ह भ प मच्छिंद्र महाराज राशिनकर, २० मार्च ह भ प अविनाश भारती महाराज, २१ मार्च ह भ प गुरुवर्य माधवराव महाराज बोरगडीकर यांची कीर्तने होणार आहेत.
 दिनांक २२ मार्च रोज शुक्रवारी सकाळी ९ ते १२ परमपूज्य बाल योगी स्वामी गजेंद्र चैतन्य जी महाराज यांचे काल्याचे किर्तन व तदनंतर गुलाल उधळून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव साजरा होऊन लगेच भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी तथा माताभगिनींनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन समस्त हळदा ग्रामवासीया तर्फे करण्यात आले आहे.