भोकर : (रमेश गंगासागरे ) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या मनमानी कारभारास व कर्मचारी वर्गास कंटाळून भिम टायगर सेना शाखा भोकरच्या वतीने उद्या गुरुवार दि,14 मार्च रोजी जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.
उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक भोकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत की, बँकेत वृद्ध नागरिकांची वेगळी रांग करण्यात यावी, पासबुक वर एन्ट्री दररोजच्या दररोज करण्यात यावी, येथील कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना मानवतेची वागणूक देण्यात यावी, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुका मध्ये सुधारणा करण्यात यावी, लेनदेन काउंटर ची संख्या वाढविण्यात यावी, बँकेत ग्राहकांसाठी बसण्याची सोय करावी, बाहेरची मुतारी हटविण्यात यावी, यांसह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत, यापूर्वी अनेकदा याच बँकेपुढे नागरिकांनी आंदोलने केली होती, पण या आंदोलनाचा या बँकेवर काहीच परिणाम झाला नसल्याने नागरिक आता अधिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते, सदरील आंदोलनाचे नेत्रत्व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड हे करत आहेत.
0 Comments