भोकर :(रमेश गंगासागरे ) सध्याच्या काळात शेतकऱ्यांनी विविध बँका व पतसंस्था यांच्याकडून अल्प दरात मिळणारे कर्ज मोठ्या प्रमाणात घेऊन ज्या कामासाठी कर्ज घेतले त्याच कामासाठी कर्जाचा उपयोग केला तरच शेतकऱ्यांचा विकास शक्य आहे अन्यथा शेतकऱ्यांचा विकास होऊ शकत नाही. असे मत प्रसिद्ध उद्योजक कथा व्हि. पि.के. उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी सिंधीकर यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील लामकानी येथे साईकृपा दूध डेरी च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभु पाटील पूयड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरी बाजार समितीचे संचालक गंगाधर चिंताके, पत्रकार बालाजी नार्लेवाड, सरपंच प्रकाशराव सूर्यवंशी, उपसरपंच रवी पाल्लेपाड,चेअरमन सोपानराव पवार आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या सर्वात जास्त शेतकरी वर्ग आर्थिक कचाट्यात सापडल्या मुळे तो आत्महत्येसारखा गैर मार्ग अवलंबत आहे हे अजिबात बरोबर नसून प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय चालू करून नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला तरच त्यांचा विकास शक्य आहे.सध्या अनेक शेतीविकासाच्या पतसंस्था व राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्यांना सिंचन विहिरी,शेततळे, पाईप लाईन, ठिबक सिंचन, दुधाळ जनावरे, शेती विषयक अधुनिक अवजारे, यंत्रसामुग्री यासाठी अनुदानावर अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे, मात्र घेतलेले कर्ज ज्या हेतूसाठी मिळाले तोच हेतू साध्य करण्यासाठी त्याचा वापर करावा तरच आपला विकास शक्य आहे.
सध्या शेतकऱ्यांची मुलं गाव सोडून शहराकडे जात आहेत पण हे योग्य नसून आपण जर आपल्याच शेतीमध्ये शेती पूरक जोड धंदे चालू करून आपल्या काळ्या आईची सेवा केली तर आपण आपल्या कुटुंबाला, गावाला व देशाला पोषु शकतो आणि ही ताकद केवळ काळ्या आईतच आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती पूरक जोडधंदा सुरू केल्यास आपला आर्थिक विकासही सहज शक्य आहे. परंतु त्यासाठी योग्य नियोजन व कष्ट उचलण्याचे साहस आपल्यात असले पाहिजे असे सांगितले.
सध्या मराठवाड्यात त्यातल्यात्यात उमरी तालुका भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी हळदीचे पीक घेत आहेत. तेव्हा या हळदीवर प्रक्रिया करण्याचा प्लांट मी तुमच्या सहकार्याने सुरू करण्याच्या विचारात आहे असे सांगुन त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व माहिती मी परदेशात जाऊन घेणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर चिंताके. बालाजी नार्लेवाड हळदेकर, प्रभू पाटील पुयड आदींनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास दूध डेरी चे माजी चेअरमन निळकंठराव सूर्यवंशी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष माधवराव जाधव आदींसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार पुंडलिक चिखलपल्ले यांनी केले तर आभार व्हि.पि.के. उद्योगसमूहाचे कर्मचारी श्री जाधव यांनी मानले.

0 Comments