भोकर : (रमेश गंगासागरे ) भोकर शहरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची जंगी यात्रा भरत असते, यावर्षी यात्रेची सुरुवात दिनांक 4 मार्च ते 7 मार्च रोजी पर्यंत असून यात्रेत या वर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दिनांक 4 मार्च रोजी भव्य पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार भरत सूर्यवंशी हे राहणार आहेत, तर उद्घाटक म्हणून प्रकाश देशमुख भोसीकर जिल्हा परिषद सदस्य हे राहणार आहेत, पशु प्रदर्शनामध्ये सहा वर्गीकरण करण्यात आले असून यात गावरान गाय, जर्सी गाय, बैलजोडी, गोरे, दूध पिते वासरे आणि कालवड, या स्वरूपात वर्गीकरण करण्यात आली आहे, यामध्ये प्रथम बक्षीस 1001, द्वितीय 701 तर तृतीय 501 रुपये ठेवण्यात आले आहेत, दिनांक 5 आणि 6 मार्च रोजी व्हॉलीबॉलचे खुले सामने ही आयोजित करण्यात आले आहेत, यामध्ये प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये रोख आणि पारितोषिक, प्रथम बक्षीस सात हजार रुपये, तृतीय बक्षीस पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहेत, तसेच या यात्रेत दिनांक पाच ते सहा मार्च रोजी भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये ह. भ.प. डॉक्टर उद्धवराव गाडेकर महाराज आणि दुसऱ्या दिवशी ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांचे कीर्तन होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात मध्ये नमूद करण्यात आले आहे तर 7 मार्च रोजी दुपारी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राबाहेरील नामांकित कुस्तीपटू येणार असल्याचे पाहून यावर्षी प्रथम बक्षीस 21 हजार 111 रुपये ठेवण्यात आलेले आहेत तरी या यात्रेचा सर्व गावकऱ्यांनी व जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.

0 Comments