भोकर :(रमेश गंगासागरे) आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी भोकर तालुक्यातील दिव्यांग महिला व पुरुषांचा भव्य मोर्चा आज दिनांक 1 मार्च 2019 रोजी धडकला.
        शुक्रवारी दुपारी शहरातील मुख्य रस्त्याने हा मोर्चा निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी चौक मार्गे तहसील याठिकाणी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले, या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांनी केले होते, तहसील परिसरात मोर्चा आल्यानंतर राहुल साळवे यांनी सर्व दिव्यांग महिला व पुरुषांना सविस्तर मार्गदर्शन केले, आणि या मागण्यांचे निवेदन तहसिल व उपविभागीय अधिकारी भोकर यांना सादर करण्यात आले असून, सादर करण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत क्रमांक एक भोकर नगर परिषदेकडे दिव्यांचा शासन निर्णय राखीव निधी सन 2010 ते आजवरचा त्वरित पूर्णता वाटप करणे भोकर नगरपरिषद हद्दीत बेरोजगार दिव्यांग महिला व पुरुषांसाठी स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देणे क्रमांक दोन भोकर नगर परिषदेत अंध आणि अपंग व्यक्तींचा शिल्लक अनुशेष तात्काळ भरून काढणे, क्रमांक 4 नगर परिषदेच्या एकूण पाण्यापैकी दिव्यांग व्यक्ती साठी राखीव असलेले गाळे व्यक्तींनाच वाटप करण्यात यावे दिव्यांग व्यक्तीच्या नावावरील इतर व्यक्तीने घेतले असल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अनुक्रमांक पाच पंचायत समिती भोकर कडील दिव्यांचा राखीव निधी इसवी सन 2015 पासून ते आजवरचा तात्काळ खर्च करावा या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आमच्या प्रतिनिधीशी सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांनी सांगितले आहे सदर मोर्चात भोकर तालुक्यातील असंख्य दिव्यांग महिला व पुरुष सामील झाले होते