भोकर :(रमेश गंगासागरे ) जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 42 जवान मृत्युमुखी पडले होते, या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केल्या जात असतानाच या जवानांच्या कुटुंबीयांना भारतभरातून मदतीचा ओघ सुरू आहे भोकर तालुक्यांमधूनही या जवानांच्या कुटुंबियांना अनेकजणांनी आर्थिक स्वरूपात मदतीचा हात दिला आहे, आज दिनांक दोन मार्च रोजी भोकर येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजु रेड्डी लोकावाड यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्या सोबत तहसीलदार श्री, सूर्यवंशी यांच्याकडे रोख 25 हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे भोकर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट चे सर्व स्थरातून अभिनंदन केल्या जात आहे, यावेळी त्यांच्यासोबत गजू पाटील, दिगंबर देशमुख, प्रशांत जोशी, किशोर नरवाडे, साईनाथ पदमवार, विजय मारुडवार, अर्जुन जाधव, अशोक रेड्डी, विश्वास धात्रक यांच्यासह अनेक जणांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

0 Comments