भोकर :(रमेश गंगासागरे )  
            आज दिनांक 24 मार्च रोजी बैतुलमाल कमिटी शाखा भोकर च्या वतीने मोठा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला यात 14 जोडपी विवाह बंधनात अडकली, वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती दिसून आली.


        शहरातील किनवट रोड वरील सुपर गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बैतुलमाल कमिटीने भोकर शहरात नवा आदर्श ठेवत सामूहिक विवाहाचे  आयोजन केले होते,  या विवाह सोहळ्यास मोठा प्रतिसाद मिळाला असून यावर्षी 14 जोडपी मान्यवरांच्या साक्षीने विवाहबंधनात अडकली, वधूवरांना बैतुलमाल कमिटीच्या वतीने संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात देण्यात आले, सदरील विवाह सोहळ्यातील वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार अमिता भाभी चव्हाण,  वंचित आघाडीचे डॉक्टर यशपाल भिंगे, एम.आय.एम चे जिल्हाध्यक्ष पठाण, नागनाथ घिसेवाड,  गोविंदबाबा गौड पाटील,  सुभाष पाटील घंटलवार, सुभाष पा. किन्हाळकर, सभापती जगदीश पा. भोसीकर, माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर,  हमीद खान पठाण,  संपादक रमेश गंगासागरे,  बाबा खान पठाण,  पोलीस निरीक्षक विकास पाटील, भारिपचे तालुकाध्यक्ष सुभाष तेले,  पत्रकार, वकील आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, बैतुलमाल कमिटीच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा आणि पाहुण्यांचा यथोचित सत्कार करून मोठ्या प्रमाणावर भोजनदान करण्यात आले होते.