भोकर :(रमेश गंगासागरे) महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा व्हावा असे मनोगत श्री शाहू महाराज विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक श्री साबदे सर यांनी व्यक्त केले ते भोकर चा बसस्थानकात आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
भोकर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख श्री,पावरा हे होते, साबदे सर पुढे बोलतांना म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिन हा दिवस केवळ बस आगारातच साजरा न होता तो शाळा, महाविद्यालय व शासनाच्या विविध कार्यालयात व्यापक प्रमाणात साजरा झाल्यास खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिनाचे मोठेपण प्रत्येकाच्या मनापर्यंत मराठी भाषेचा गोडवा जाईल व त्या दिवशी सर्वांच्या मनात आपुलकी निर्माण होईल, असे ते यावेळी म्हणाले, यावेळी आगार प्रमुख श्री पावरा यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, आगारातील चालक व वाहक कर्मचाऱ्यांनी मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या मायबोलीचा वापर करावा, तसेच या कार्यक्रमात पत्रकार बालाजी नारलेवाड, पत्रकार बाबुराव पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले सदरील कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीदत्त चाटलावार यांनी केले तर आभार बालाजी मदने यांनी व्यक्त केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिट्ठी बोईनवाड, रफिक रफीक बेग, परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी एसटीने प्रवास करणाऱ्या बसस्थानकातील सर्व प्रवाशांचे आगार प्रमुख श्री पावरा यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला, कार्यक्रमात अनेक कर्मचारी हजर होते.

0 Comments