भोकर :(रमेश गंगासागरे) बारा दिवसांपूर्वीच पुलवामा येथे आतंकवादयाने केलेल्या हल्यात आपले 42 जवान शहीद झाले होते, याचा बदला म्हणून आज भल्या पहाटे भारतीय वायुसेनेच्या 12 मिराज विमानांनी पाकिस्थानातील दहशतवादी अड्ड्यावर तुफानी हल्ले करून जवळपास 300 दहशतवादयांना यमसदनी पाठवले याची वार्ता समजताच या घटनेचा आंनद साजरा करण्यासाठी आज भोकर शहरात शेकडो युवक शहरातील डॉ, आंबेडकर चौकात सकाळी 11:30 वा, जमून पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला यात भोकर शहर व तालुक्यातील शेकडो देशभक्त युवक सामील झाले होते.

0 Comments