नांदेड : (रमेश गंगासागरे)
गुरु रविदास यांचा खरा इतिहास लपऊन ठेऊन भ्रामक इतिहास आतापर्यंत सांगण्यात आला. त्यांच्या नावाने भवभक्तीचे भ्रम तयार करण्यात आले, वास्तविक गुरु रविदास यांनी भक्तीचे नाही तर मानव मुक्तीचे कार्य केले असे प्रतिपादन बहुजन प्रबोधनकार प्रकाश समशेर (मुंबई) यांनी केले.
गुरु रविदास सार्वजनिक जयंती महोत्सव समिती नांदेडच्या वतीने गुरु रविदास चौक, तरोडा नाका, नांदेड येथे आयोजित गुरु रविदास जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश समशेर बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ खंदारे (पुणे) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या भाषणात प्रकाश समशेर पुढे म्हणाले की, १५ फेब्रुवारी ही गुरु रविदास यांची जन्मतारीख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः अभ्यास करुन शोधून काढली व पहिली जयंती वैज्ञानिक पद्धतीने दिल्लीत १५ फेब्रुवारी १९५३ रोजी दिल्ली येथे साजरी केली. गुरु रविदास हे चमत्कारी बाबा नाही तर महान क्रांतीकारी नेते होते म्हणून डॉ. आंबेडकरांनी आपले पुस्तक गुरु रविदास यांना अर्पण केले. गुरु रविदास यांच्या समतावादी विचारांचा भारतीय संविधानात समावेश करण्यात आला.
राष्ट्रीय गायक हरिदास पुसे (औरंगाबाद) यांनी यावेळी क्रांतीगिते सादर केली. यावेळी डॉ. पी. टी. जमदाडे, डॉ. सौ. कल्पना जमदाडे, डॉ. राहुलकुमार अन्नपूर्णे, पद्माकर बाबरे, लक्ष्मण सुर्यवंशी, जमणाजी डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमराव वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले. शेवटी हणमंत उतकर यांनी आभार मानले. नारायण वाघमारे, विठ्ठल उकंडे, संतोष बोराळकर, संजय वाघमारे, संभाजी कांबळे, अर्यदेव उतकर, मीनाक्षी वाघमारे, मंजुषा बाबरे , सुरेखा उकंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
रन फॉर रविदास, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. यावेळी माधव गायकवाड, आनेजी शहारे, गणपतराव वाघमारे, पिराजी सोनटक्के, देविदास टोम्पे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यासाठी शिवराज कांबळे, अक्षय सोनटक्के, वसंत अन्नपूर्वे, स्वप्नील उकंडे, परमेश्वर कांबळे, बालाजी टॉम्पे आदींनी परिश्रम घेतले.

0 Comments