भोकर(रमेश गंगासागरे) दिनांक 15 फेब्रुवारी रोजी नांदेड येथुन काशीकडे जाणाऱ्या चर्मकार समाजाच्या भव्य जत्यात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन त्यांना रवाना केले.
दरवर्षी समाजबांधव मोठ्या प्रमाणात काशी येथील गुरू रविदास महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या शीर गोवर्धनपुर येथे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्यासाठी जात असतात, काल दि,15 फेब्रुवारी रोजी नांदेड ते बुद्धगया कडे जाणार्या दिक्षाभुमी एक्सप्रेस गाडीस नांदेड रेल्वे स्स्टेशन मध्ये ज्येष्ठ पोलिस निरीक्षक बालाजीराव सोनटक्के अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर नारायणराव सोनटक्के यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, नांदेड जील्ह्यातील चर्मकार समाजातील 120 लोकांच्या या भव्य जथ्याचे नेत्रत्व पत्रकार रमेश गंगासागरे आणि संतोष नरवाडे हे करत आहेत, हा जथा बुद्ध गया, ईलाहाबाद त्रिवेणीसंगम, काशी करुन 21 फेब्रुवारीस नांदेड येथे पोहचेल.

0 Comments