भोकर :( रमेश गंगासागरे) शहर व तालुक्यात आपल्या प्रखड बातमी पत्राने सर्वांवर छाप पाडणारे इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील प्रभावशाली माध्यम म्हणजे एमसीएन चॅनेल न्यूज चॅनल च्या पहिल्या वर्धापन दिनाला शहर व तालुक्यातील खास मान्यवरांनी मनमोकळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
        शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील संगम फंक्शन हॉल मध्ये दिनांक 28 जानेवारी रोजी या दोन्ही चॅनलच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,  कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला,  या कार्यक्रमास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील,  सामाजिक कार्यकर्ते हमीद खान पठाण,  पत्रकार रमेश गंगासागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरफोद्दीन,  पत्रकार हिरे, मौलाना मोबिन इनामदार, सुभाष तेले, शमीम इनामदार,  साई पाटील, ताहेर बेग  यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत,  सदरील कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार शेख फईम यांनी केले होते.