भोकर : (रमेश गंगासागरे ) प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दिनांक 19 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान अनेक कार्यक्रमाचे आणि खेळाचे आयोजन करण्यात आले आहे यात आनंदनगरी, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक, हॉलीबॉल, आणि दिनांक 25 जानेवारी रोजी प्रख्यात साहित्यिक तथा कवी इंद्रजित भालेराव यांचा दुपारी 1 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 22 जानेवारी रोजी शाहू विद्यालयाच्या भव्य पटांगणावर विद्यार्थ्यांतर्फे आनंद नगरी आनंद मेला ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,यामध्ये लहान विद्यार्थ्यांनी मुरमुरे, खिचडी भजे पाणीपुरी, गोड खाद्यपदार्थ विक्री करून खरी कमाई चे दर्शन केले, या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर यांनी व सर्व शिक्षकांनी चिमुकल्यांचे तोंड भरून कौतुक केले.

0 Comments