भोकर : (रमेश गंगासागरे) माझी संघटना संपूर्णपणे अराजकीय असून महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी आणि अठरापगड जातीच्या कल्याणासाठीच असल्याचे प्रतिपादन मावळा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे पाटील यांनी भोकर येथील पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना इंडस्ट्रीमध्ये 80 टक्के जागा मिळाव्यात, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शहर व तालुक्याच्या ठिकाणी राहण्याची सोय व्हावी म्हणून एक हजार मुला-मुलींसाठी वस्ती ग्रहाची निर्मिती करून घेण्यासाठी माझी संघटना तत्पर असल्याचे ते यावेळी म्हणाले, यासाठी मी, राज्यातील साखर सम्राट, सहकार सम्राट आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना साकडे घालणार आहे, औरंगाबाद मध्ये महात्मा गांधी मिशन मध्ये हे काम हाती घेतले असल्याचे ते यावेळी म्हणाले, त्यांनी या पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत मनमोकळेपणाने चर्चा केली, हसत-खेळत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली, यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव कदम पाटील, पंढरीनाथ गोडसे, आनंदराव कदम पाटील लगळूदकर, दशरथ पाटील कदम, श्याम पाटील, शिवाजीराव माने आणि जितेंद्र सावंत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

0 Comments