बुलडाणा : (रमेश गंगासागरे) अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर संपादित सन २०१९ साठीच्या जय रविदास दिनदर्शिकेचे प्रकाशन पशू व दुग्ध संवर्धन मंत्री मा. ना. महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांवर आधारित असलेली जय रविदास ही दिनदर्शिका घरोघरी लावावी. चंद्रप्रकाश देगलूरकर हे माझे सहकारी आहेत. आम्ही चळवळीत एकत्र काम केले आहे. ते नोकरीतून आणि मी राजकारणातून समाज सेवेकडे वळलो. समाज सेवा हे आमचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन ना. महादेव जानकर यांनी यावेळी केले.
चंद्रप्रकाश देगलूरकर यांना सहकार्य करा, त्यांच्या पाठीशी रहा. अन्य कोणत्याही जातींचा द्वेष न करता चर्मकार समाजाचे संघटन मजबूत करा असे आवाहनही शेवटी ना. महादेव जानकर यांनी केले.
यावेळी मंचावर खा. प्रताप जाधव, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, चर्मकार ऐक्य परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि. डी. टी. शिपणे, युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.तसेच दुसऱ्या दिवशी दि.६ जानेवारी रोजी प्रख्यात सप्त खणजेरी वादक श्री, सत्यपाल महाराज यांनी सुद्धा या दिनदर्शिकेचे तोंडभरून कवतुक केले आहे.

0 Comments