भोकर :(रमेश गंगासागरे) तथागत भावान बुध्दाचा धम्म हा विज्ञानावर आधारीत असल्याने अंध्दश्रध्दा जोपासून धम्म कदापी कळणार नाही . धम्माची सांगड विज्ञानाशी आहे म्हणून विज्ञानाच्या आधारे उपासकांनी धम्म समजून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भदंत महाथेरो बुद्धपाल यांनी धम्मदेसना देतना केले .
भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा भोकरच्या वतीने श्रमणेर बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबारास १८ जानेवारी पासून पंचशील बुद्धविहार येथे प्रारंभ झाला या श्रामणेर संघास ठीकठीकानी श्रद्धावान उपासकाकडून भोजनदान देऊनआदरातिथ्य करण्यात येत असून २२ जानेवारी रोजी समतानगर भोकर येथे संघास उपासक श्रीधर नागोराव घुले यांच्याकडून भोजन दान करण्यात आले . याप्रसंगी केंद्रीय शिक्षक व्हि.एन. निसर्गंध, बी .ए. जंगमे , यशवंत चित्ते, ए.पी. येरेकार, पी .एम. तोडे, बी .एस. सरोदे, जी .एम. गोवंदे, यु .एन. येडके, अशोक कदम, एम.एम. धोतरे यांची उपस्थिती होती . पुढे बोलतांना महाथेरो बुध्दपाल म्हणाले सामाजिक भावनेतून सिद्धार्थ गौतमानी गृहत्याग करून दुःख मुक्तीचा मानव केंद्रीत धम्माची स्थापना करून सर्वच प्राणीमात्राच्या कल्याणाच्या धम्माचा प्रचार प्रसार केला तदवतच डॉ . बाबासाहेब आंबेडकर मानवतेचे पुजारी होते म्हणून सर्वांच्या कल्या साठी घटणा लीहीली असून स्वातंत्र्य बंधुता न्याय ही त्रिसुत्रे घटनेत अंतरभूत केली म्हणून या देशातील प्रत्येक माणूस सुरक्षित आहे म्हणून बुध्दाच्या मुलसिद्धांतावर आधारीत घटना आबाधीत ठेवण्याचे आवाहन उपस्थितांना केले .

0 Comments