भोकर :(रमेश गंगासागरे) भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात य.च.म.मुक्त विद्यापीठा अंतर्गत एम.ए./ एम.एस्सी./एम.काँम. या शिक्षणक्रमाच्या परीक्षा ३ जानेवारी २०१९ पासुन  चालू झालेल्या आहेत. या परीक्षा केंद्रावर ३३५ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत.
       सदरील परीक्षा संस्थेचे अध्यक्ष डाँ. माधवराव पाटील किन्हाळकर , सचिव मुरादसाब मांजरमकर,प्राचार्य तथा केंद्र प्रमुख डाँ. पंजाब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत चालु
 आहेत .
       या परीक्षा केंद्रावर विद्यापीठ प्रतिनिधी  बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून हिमायतनगर माहाविद्यालयाचे डाँ.प्रा.कदम विश्वनाथ तर अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून केंद्र संयोजक प्रा.होगे राधाकिशन हे काम पाहत आहेत . तर परीक्षा अंतर्गत जबाबदारी केंद्र साह्ययक प्रल्हाद सुंर्यवशी, बादे लिंगारेड्डी, सुनिल सोनकांबळे, पांडुरंग बेलकर मामा   यशस्वीपणे  पार पाडत आहेत.
परीक्षा पर्यवेक्षक म्हणून  डाँ.कांबळे भिमराव, डाँ. बेरदेवाड ओम,प्रा.हाके पंकज, प्रा. कांडलीकर अभिजित,   प्रा.रायभोळे प्रदीप, कदम आनंद ,पुपलवाड पांडुरंग , साजीद एम.डी., जाधव जमुना, सुर्यवंशी गजानन सह पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. अतंर्गत परीक्षा  नियंत्रण पथकात  डाँ.चव्हाण सतीश, डाँ.जाधव जे.टी., डाँ.काळे संजय, डाँ.फोले कमल, प्रा.टाके प्रशात,ई.यशस्वीपणे काम करीत आहेत.