बुलडाणा : (रमेश गंगासागरे) संघटनेमध्ये फार मोठी ताकत असते. इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून हे पाचवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन होत आहे. हे फार मोठे परिवर्तनाचे काम आहे. याचा आदर्श समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
बुलडाणा येथे आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन प्रसंगी रविवारी ६ जानेवारी रोजी दुपारी समाज प्रबोधन सत्रात सत्यपाल महाराज बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सतनाम सिंह, साहित्यिक मधू बावलकर, विद्याप्रकाश कूरिल, माजी आमदार व चर्मकार ऐक्य परिषदेचे अध्यक्ष बाबुराव माने, कार्याध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, कोषाध्यक्ष रामभाऊ कदम, समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि. डी. टी. शिपणे, युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, सामाजिक कार्यकर्ते वसंत धाडवे, हरिभाऊ खंदारे, एड. राजकुमार पांडव, संजय तरवरे, पांडुरंग खंदारे, मा. न्यायाधिश सुरेश खोपडे, राष्ट्रीय गायक हरिदास पुसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या प्रबोधनात सत्यपाल महाराज पुढे म्हणाले की, जे शिकले ते अति शहाणे निघाले. गाडी, माडी, साडीत बरेचजण गुंतून पडले आहेत. सामाजिक बांधिलकी हरवत चालली आहे. बायको मेली की लगेच दुसरी बायको करतात. माझी बायको मेली तर कसलेही कर्मकांड न करता मी देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान दिला. मी आजही माझ्या आईचे लुगडे धुतो. त्याग आणि समर्पण याशिवाय कांहीही साध्य होत नाही. मान्यवर कांशीराम यांनी भरपूर त्याग केला. एखाद्या ऋषी सारखे जीवन ते जगले. त्यांचाच आदर्श घेतल्यामुळे बहन मायावती मुख्यमंत्री बनू शकल्या. महिलांनी मायावतीसारखे कणखर बनावे.
दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या आणि विधवा महिलांचा साडीचोळी देऊन सत्यपाल महाराजांनी यावेळी सत्कार केला. बुलडाणा येथे नग्न धिंड काढण्यात आलेली चर्मकार भगिनी राधाबाई उंबरकर आणि चौथ्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भगवान भोईर यांचे निधन झाले म्हणून त्यांच्या पत्नी श्रीमती शालिनी भोईर यांचा सत्यपाल महाराज यांच्या हस्ते कृतज्ञता गौरव करण्यात आला.
महिलांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता संघर्ष करावा. नवरा दारु पिऊन त्रास देत असेल तर त्याला घराबाहेर बसवावे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे आपल्या पतीला सामाजिक कार्यात मदत करावी. दगड धोंडे पुजू नये आणि उपासतापास करु नये. अंधश्रद्धा सोडून द्या. गुरु रविदास, गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आपल्या घरात लावावेत असेही सत्यपाल महाराज शेवटी म्हणाले.
यावेळी गर्दे हॉल खचाखच भरले होते व बाहेर स्क्रीनवर कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी झाली होती. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण शिराळे, उपाध्यक्ष सुखदेव शिरसाट, कार्याध्यक्ष डॉ. बबन परमेश्वर, कोषाध्यक्ष शरद खरात, सल्लागार इंजि. अशोक भोसले, जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे, प्रसिद्धी प्रमुख समाधान चिंचोले, संघटक शोभाताई चांदोरे, सहसंघटक रेखाताई चांदले आदींच्या उपस्थितीत सत्यपाल महाराज यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0 Comments