भोकर : (रमेश गंगासागरे) मौजे समंदरवाडी ता. भोकर येथील राहिवाशी सुभाष तुकाराम भिसे वय ३५ वर्ष यांचे ऱ्हदयविकाराच्या झटक्याने आज ता ४ जानेवारी  २०१९  रोज शुक्रवारी दुपारी २ वाजता  नांदेड येथे उपचारा दरम्यान  निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते कालवश सुभाष भिसे  यांच्या पार्थिवावर उद्या शनीवारी ठिक १०  वाजता मौजे समंदरवाडी ता. भोकर या गावी  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुभाष तुकाराम भिसे हे भोकर तहसील कार्यालयात लिपीक या पदावर काम पहात होते, त्यांचा शांत स्वभाव होता शासकिय सेवेच्या माध्यमातुन अनेक नागरीकांचे काम हिरहिरीने करित होते, त्यांच्या अकाली जाण्याने संमदरवााडी गावावर शोककळा पसरली आहे, त्यांच्या पश्चा्त पत्नी, एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे.