भोकर: (रमेश गंगासागरे) आज दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना शाखा भोकर यांच्यावतीने भोकर तहसीलवर आपल्या विविध मागण्यासंदर्भात भव्य मोर्चा काढण्यात आला.
         मागील अनेक वर्षापासून आपल्या प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाला वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही शासन आपल्या मागण्या कडे लक्ष देत नसल्याचे पाहून भोकर येथील शालेय पोषण आहार अंगणवाडी कर्मचारी बांधकाम कर्मचारी यांच्या वतीने 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता लहुजी चौक  येथून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते हातात लाल बावटा घेऊन भोकर तहसिलवर भव्य मोर्चा काढला असून तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्यवर्ती सरकारच्या मानधनात वाढ करण्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी विनाविलंब करण्यात यावी, कार्यालयातील शालेय पोषण आहाराच्या कालबाह्य बिलासाठी दोषी असणाऱ्या यंत्रणेकडून रक्कम वसूल करून लाभार्थ्यास वाटप करण्यात यावी,  45 व्या भारतीय कामगार परिषदेच्या शिफारशी मान्य कराव्यात, समान कामाला समान वेतन वाटप करावे, महागाई भत्यासह किमान वेतन 18 हजार रुपये लागू करण्यात यावे, सामाजिक सुरक्षा लागू करावी, शालेय पोषण आहाराची बिले त्वरित वाटप करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन आज रोजी देण्यात आले असून निवेदनावर शिवाजी वारले, अध्यक्ष बाबुराव पाटील, मारुती पाटील, अनिल कराळे, दिलीप पोत्रे, यांच्या सह्या आहेत, तर प्रकाश गायकवाड, गणेश राठोड, शकुंतला बोबडे, द्रोपदाबाई, गणपत मांजरेकर, शिवाजी गायकवाड, यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते.