मुंबई :(रमेश गंगासागरे)  भोकर येथील सेवालाल गडाचे व्यवस्थापक बाळू महाराज यांना मुंबई येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
        बाळू महाराज हे भोकर येथील सेवालाल गडाचे व्यवस्थापक असून मागील अनेक वर्षापासून त्यांनी सेवालाल गडावर सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दिनांक 13 जानेवारी रोजी मुंबई मधील कल्याण येथील बंजारा भवन मध्ये झालेल्या एका भव्य कार्यक्रमात भाई राठोड आणि अण्णासाहेब राठोड यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  त्यामुळे बाळु महाराज यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.