भोकर :(रमेश गंगासागरे)  भोकरहुन रायखोडकडे भरवेगात जाणारी व रायखोडहुन भोकरकडे येणारी
 मोटारसायकल समोरा समोर धडकून  एक तरूण गंभीर जखमी झाला असुन सदरील घटना आज रविवार  ता. २७ जानेवारी २०१९  रोजी संध्यााकाळी ७.३० वाजता भोकर- उमरी रस्त्यावरील सागवान फाट्याजवळ घडली आहे.
      सविस्तर वृत असे की, रवीवारी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास भोकर  येथील दत्ता पांडुरंग भंडरवाड  वय २३ वर्षे यास मोटारसायकलने समोरा समोरून जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी  झाला,  तर दुसऱ्या मोटार सायकलवरील मौजे रायखोड ता. भोकर येथील बालाजी खंडुजी चिखलवाड वय २८ वर्ष , ज्ञानेश्वर उत्तम चिखलवाड वय १४ वर्ष रा. रायखोड,  येथील असुन हे किरकोळ जखमी झाले आहेत, यांना अधिक उपचारासाठी शासकिय रुग्णालय भोकर येथे दाखल करण्यात आले, जखमीवर डॉ. दिलीप फुगारे , ब्रर्दर निलेश पाासबाई , डि. जे. घोडके , बि डी घोडके यांनी प्राथमिक उपचार करून शासकिय रुग्णालय नांदेड येथे पाठवण्यात यातील भंडरवाड हा युवक रायगड येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी चेरकेवाड यांचे ते भाचे आहेत.