पांडुरणा : (रमेश गंगासागरे) तालुक्यातील पांडुरणा येथे आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गावातील भोकर मुदखेड रोड वरील चौकाचे शहीद चौक असे नामकरण करण्यात आले.
पांडुरणा गावातील बि. एस. एफ. मध्ये कार्यरत असलेले जवान बालाजी डकोरे हे बांगला देश येथील डांगापाडा पोस्ट वरती शहीद झाले व दोन महिन्या पूर्वी मारोती राजेमोड हे जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे सेवा बजावताना त्यांना विर मरण आले, त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांना अमर ठेवण्यासाठी शहीद बालाजी डकोरे व शहीद मारोती राजेमोड याच्या नावे शहीद चौकाचे नामकरण आज पांडुरणा येथे करण्यात आले, या वेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मेजर हायुण पठाण, जिल्हा सचिव ढाके साहेब, ग्रामसेवक बालाजी इंगळे, वनरक्षक नितीन शिनगारे, शैलेश चौदंते, शहीद पिता कोंडीराम राजेमोड, एल. आर. दासरवाड, बालाजी राजेमोड, किसनराव राजेमोड ,माधव शिंदे, केशव निमलवाड, आदिंची उपस्थिती होती, या वेळी गावातील तरुणांनी व्यसनमुक्ती ची शपथ घेऊन शहीद जवानांचा आदर्श घेत जास्तीत जास्त तरुण सैन्यामध्ये जाऊ अशी शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे आयोजन कमलाकर बरकमकर, नवनाथ झम्पलवाड, गंगाधर राजेमोड, मदन झम्पलवाड सुनिल मदनवाड यांनी केले होते.

0 Comments