भोकर :(रमेश गंगासागरे)  शहरात 25 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान मतदार जनजागृती तसेच लोकशाही पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत दिली आहे.
     तसेच मतदार दिनानिमित्त  दिनांक 25 जानेवारी ह्या मतदार दिनी भोकर तहसीलच्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य रॅली  आयोजीत करण्यात आली आहे . तसेच ह्या लोकशाही पंधरवड्यादरम्यान भोकर नगरपरिषदेच्या वतीने शहरात मतदार नोंदणीबाबत प्रभात फेरी काढणे, शहरातील सर्व वयोगटासाठी मतदान करण्याबाबत चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रभाग निहाय सभा, तसेच महिलांसाठी विशेष सभा घेऊन मतदार यादी मध्ये नाव नोंदविण्याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री बागुल यांनी दिनांक 23 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे,  या पत्रकार परिषदेस तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री बागुल गटविकास अधिकारी आणि पत्रकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.