भोकर :(रमेश गंगासागरे)  तालुक्यात शिवसेना शाखा नाम फलकाचे कार्यक्रम दिनांक २० रोजी पार पडले असून तालुक्यातील तब्बल ३१ गावात शाखा उघडल्या गेल्या असल्याचे तालुका प्रमुख अमोल पवार यांनी कळविले आहे.
      उध्ववजी ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून तालुक्यात  मरगळलेळी शिवसेना सतेज करत गांव तेथे शाखा स्थापन करून शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी अशोकरावांच्या मतदारसंघात एकाच दिवशी 31 शाखांच्या उद्घघाटनांचे कार्यक्रम आयोजीत  करण्यात आला होता यावेळी  शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव साहेब यांच्या हस्ते व आमदार हेमंतभाऊ पाटील, आमदार नागेशभाऊ आष्टीकर, प्रकाश कौडगे, डॉ.मनोज भंडारी,दयालभाऊ गिरी,धोंडूदादा पाटील, जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर,दत्तापाटील पांगरीकर, जेष्ठनेते धनराज पाटील पवार,भोकर तालुका प्रमुख अमोल पाटील पवार,प्रकाश मारावार, संतोष आलेवाड,नारायण पाटील पोमनाळकर, बालाजी येलपे, राजू पोगरे,साहेबराव भोंबे,सुभाष नाईक,गंगाधर महादावाड, परमेश्वर पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थिती होती या एकाच दिवसात रायखोड, सायळ, नागापुर,  चिंचाळा, सोणारी, सावरगाव, कांडली, पिंपळढव,मो घाळी, हळदा,धारजनी रहाटी,पोमनाळा, डोर, रेणापूर, कोळगांव बु, कोळगांव खु, गारगोठवाडी, पाळज, दिवशी बु, दिवशी खु, महागाव, किनी, कासारपेठ तांडा, देवठाना, सोमठाणा, रिठा, जाकापूर, हस्सापूर, पांडूर्णा, कामंनगाव आदी गावोगावी  मेरौथाण ३१ शिवसेना शाखा नाम फलकाचे अनावरण केले असून भोकर तालुक्याच्या शिवसेनेत इतिहासात पहिल्या टप्यात प्रथमच तालुक्यात मोठया प्रमाणात गाव तेथे शाखा उघडले आहेत .त्यामुळे आता अशोकरावांच्या मतदारसंघात शिवसेनाला राजकीय संजीवनी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.