भोकर : (रमेश गंगासागरे) येथील बहुजन चळवळीतील जेष्ठ समाजसेवक, बहुजनांचे नेते तथा भोकर पंचायत समितीचे माजी सभापती गोविंदबाबा गौड पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
     दिनांक ०३ जानेवारी रोजी बहुजनाचे नेते गोविंद बाबा गौड पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर तसेच श्रीकृष्ण भगवान प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ईयत्ता पहिली ते दहावी पर्यन्तच्या विदयार्थ्यसाठी रांगोळी स्पर्धचे अयोजन करण्यात आले असून या दिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णाणालयात फळवाटप  करण्यात येणार आहे. यामध्ये कै.बाबागौड प्राथमिक  शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास एकूलवार, व भागिरथीबाई माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक एन. एल. पाकलवार, शिक्षकवृंद आणि, दिलीप के.राव, आरेफ ईनामदार यांच्याकडून अनेक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले असून सोबतच  शहरातील सर्वच विविध पक्षाच्या राजकीय मंडळीची उपस्थिती राहणार आहे.