भोकर :- (
रमेश गंगासागरे) येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात झालेल्या कर्मच्याऱ्याच्या एका महत्वपूर्ण बैठकीत वनरक्षक वनपाल संघटना नागपूरची कार्यकारिणी व्ही.टि. राठोड वनपाल देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आली यात भोकर तालुका अध्यक्ष म्हणून बी.एन. पेरलेवाड, उपाध्यक्ष ए. एन. झंपलवाड वनरक्षक, सचिव एस.पी.दासरवाड, महिला संघटक डी. डी. विभुते, कोषाध्यक्ष आर.एन. शेलार, सहसचिव शेख मुख्तार, आदींची निवड करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वडजे, ज्ञानेश्वर धोंडगे, डी.एन.बोरकर, लोकडेश्वर गव्हाणे, डी.ए.हागदळे, जी.बी.कोतलवाड, आर.पी.गायकवाड, जी.बी.राठोड, के.जी. जाधव, सुनिता भिसे, अब्दुल गणी, सुर्यस्कर, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार एम.एम.धोतरे यांनी केले कार्यक्रमास बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते, निवड करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्याचे सर्वस्थरातून अभिनंदन केले जात आहे.
0 Comments