भोकर : (रमेश गंगासागरे) पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या बोरगाव येथे लपून छपून सुरु असलेल्या जुगार अडयावर पोलीसांनी काल दि,१० जानेवारी रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास धाड टाकून दहा खेळाडूंना अटक केली, त्यांच्याकडून सुमारे ४५७०/- ₹ रुपयाचा मुद्येमाल पोलीसांनी जप्त केला आहे. त्यांचावर मुंबई जुगार कायदया अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.         
      पोलीसांनी अटक केलेल्या मध्ये मारोती हुबेवाड, परमेश्वर घुमनवाड, साहेबराव भारती, प्रदिप कोंडावार, रवी पुरी, गजानन दासरवाड, सुरज रुमनवाड, दत्ता  रुमनवाड, हनूमान बैईवाड, गजानन हुब्बेवाड या सर्वांचा समावेश आहे. मागील कांही दिवसापासून भोकर शहरासह तालुक्यातील खेड्यात अवैध धंद्यानी डोके वर काढल्याची ओरड विविध पक्ष व सामाजीक संघटनाकडून होत होती. या पार्श्वभूमीवर विविध वृत्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होताच प्राप्त माहिती वरुन काल पोलीसांनी धाडसत्र राबवीले यात बोरगाव आणि भोकर येथे कारवाई करण्यात आली. फौजदार सोपान थोरवे यांच्या फिर्यादीवरून बोरगाव येथील सदरील गुन्हा दाखल करून तपास पो.हे.कॉ.जाधव यांच्याकडे  देण्यात आला. तर दुसऱ्या भोकर येथील मटक्याच्या धाडीत फौजदार थोरवे यांच्या पथकाने मुदखेड रोडवरील मारोती मंदिराच्या मोकळ्या जागेत मटका घेणाऱ्या अयुब शेख यास अटक करण्यात आले आहे. मुख्य अरोपी पवन चेनापूरकर हा मात्र पोलीसांना गुंगारा देऊन पसार झाला आहे. या धाडीत अरोपीकडून १२५० /- ₹ रुपयाचा मुद्देमाल जप्त  करुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आधिक तपास पोहे. कॉन्सटेबल हानवते हे करत आहेत.या धाडीमुळे अवैद्य धंदे चालकात मोठी दहशत निर्माण झाली असून त्यांना पळताभुई झाली असल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत आहे.