भोकर :(रमेश गंगासागरे) शिवसेना पक्षा तर्फे तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना एक महिन्याचे राशनचे वाटप जिल्हा प्रमुख आनंद बोढारकर यांच्या हस्ते भोकर येथील शिवसेना तालुका कार्यालयात दि.२ जानेवारी रोजी करण्यात आले.
राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याने, शेतकरी आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवत असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी व शिवसेना पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे जाणीव करून देण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात एका महिन्याचे मोफत धान्य वाटप आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्याना करण्यात आले. भोकर तालुक्यातील १८ आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना एका महिन्याचे संपूर्ण राशन जिल्हाप्रमुख आनंद बोढारकर यांच्या प्रमुख उपस्थित वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना बोंढारकर म्हणाले, शिवसेना पक्ष नेहमी ऐंशी टक्के समाजकारण तर वीस टक्के राजकारण करत असुन समाजातील तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी सक्रिय असते, मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या केल्यामुळे अनेक कुटुंब पोरके झाल्याने याची सामाजिक जाणीव ठेवून तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना धान्य वाटपाचा कार्यक्रम घेऊन मायेची उब देण्याचा प्रयन्त करत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी रंगराव राठौड, गंगाजल राठौड,सुमीत्राबाई बालाजी बत्तलवाड,लक्ष्मीबाई शेषेराव पोगर,कविता गणेश जाधव,पद्मीनबाई गोविंद पोलसवार,अनिताबाई राठौड, भुमाबाई रमेश राठोड, शेषेकला रोहीदास जाधव,मायावती गंगाधर काळे,भुमन्ना राजन्ना कासवकर,जिजाबाई दिगांबर पेनलोड,रूक्मीनबाई विठ्ठल बद्गूलवाड,शेषाबाई रामराम चव्हाण, सागर हनमंतु हंगिरगे,रंगराव दिपला जाधव,मारोती गणपती गोविंदवाड या आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या प्रतीनिधिंना धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिवसैनिक धनराज पवार, विश्वभर पवार, तालुका प्रमुख अमोल पवार, उषाताई नर्तावार, नारायण पाटील पोमनाळकर,सूभाष नाईक, सुनील जाधव,मनोहर साखरे, गंगाधर महादावाड, बालाजी येलपे,हनमंत अनंतवाड, माधव बिल्लेवाड, संतोष आर्लेवाड,नंदू पाटील, सत्यनारायण आटाळकर, वामन पर्वत, रमेश पोलकमवार, पप्पू जाकापूरकर,साईनाथ गादेपवाड, गणेश आरलवाड, राजु पोगरे,गजानन आर्लेवाड, राहुल कोंडलवार, साहेबराव वाकोडे,विजय मोरे आदी सह अनेक शिवसैनिक व सामान्य नागरिक उपस्थित होते.

0 Comments