भोकर : (रमेश गंगासागरे) भोकर मतदार संघात तीन तालुके येत असून यात भोकर मुदखेड आणि अर्धापुर तालुक्याचा समावेश आहे, या तीन तालुक्यात आता नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार यादीत 18 ते 30 वयोगटातील मतदारांची संख्या सत्तर हजार एवढी असल्याने त्यांच्यात भोकर मतदार संघात बदल घडवण्याची ताकद निर्माण झाली आहे.
       दिनांक 23 जानेवारी रोजी तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भोकर मतदार संघाची इत्यंभूत माहिती दिली आहे,  यात मतदार हेल्पलाईन क्रमांक 1950, आणि c - vijil app याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, भोकर मतदारसंघात 18 ते 30 वयोगटातील 70 हजार मतदार,  30 ते 49 वयोगटातील 62 हजार 168 मतदार,  तर भोकर तालुक्यात 54 हजार बावीस पुरुष मतदार, 51741 महिला मतदार,  अर्धापूर तालुक्यातील 43 179 पुरुष मतदार,  39 हजार 526 स्त्री मतदार,  मुदखेड तालुक्यात 45123 पुरुष मतदार,  तर 41 हजार 615 स्त्री मतदार या वेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.  यासाठी मतदारसंघात 324 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे,  तर भोकर तालुक्यामध्ये 130 मतदान केंद्रे असतील असे तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे यांनी सांगितले आहे,  मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून यासाठी नोडल ऑफिसर म्हणून तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे हे काम पाहणार आहेत,  हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असून यात केडर वर्ग 1 क्रमांकचे 34 अधिकारी,  क्रमांक दोनचे 157 अधिकारी, कॅडर 3 कॅडर क्रमांक तीन चे 2776 कर्मचारी आणि कॅडर क्रमांक चारचे 433 कर्मचारी आपले कर्तव्य बजावतील.