भोकर : (रमेश गंगासागरे) तहसिल कार्यालयाच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून शहर व तालुक्यातील असंख्य खेड्यात EVM व VVPAT मतदान यंत्रा वरील होत असलेले मतदान (प्रात्यक्षिक) पाहण्यासाठी नागरिक मोठ्ठया
संख्येने सहभागी होत आहेत.निवडणुकीत हारणारा कोणताही पक्ष ईव्हीएम मशीनवर आजपर्यंत शंका उपस्थित करत असत, त्यामुळे या मशीनची लोकप्रियता घटत चालली होती, आता निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी आपन केलेले मतदान आपल्या आवडीच्या पक्षाला झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी व खात्री करण्यासाठी आता व्होटर व्हेरिफिफिएबल ऑडिट ट्रेल मशीन म्हणजेच VVPAT उपलब्ध करून दिली आहे, या मशीनवर सात सेकंदासाठी छापील पावती आपल्या क्रमांकासह दिसणार आहे, त्यानंतर ही पावती शिलबंद डब्यात पडणार आहे, त्यामुळे EVM मशीनवर झालेल्या मतदानाची आता १०० % खात्री होणार आहे, ह्या मशीन चे प्रात्यक्षिक भोकर तालुक्यातील प्रत्येक गावात दररोज चालू असून हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी नवंतरुण मतदार आणि जुने मतदार महिला व पुरुष तोबा गर्दी करत आहेत.

0 Comments