भोकर :(रमेश गंगासागरे) भोकर ची सुजाण जनता कधी कोणास मोठे करेल आणि कोणास छोटा करेल याचा काही नेम राहिला नाही, भोकर मतदारसंघात निवडून गेलेले काहीजण मुख्यमंत्री झाले, कोनी गृहराज्यमंत्री झाले, तर कोणी भोकर च्या रस्त्यावर आजही पैदल फिरत आहेत, म्हणून भोकर च्या नागरिकांना कमी लेखून चालणार नाही ,, याचा काल झालेल्या "ईला दादा" च्या वाढ दिवसावरून दिसून आले.
ईला हा कोणता भाई, दादा आमदार,किंवा खासदार नसून तो भोकर येथिल रशीद टेकडी भागातील अत्यन्त गरीब कुटुंबातील मुस्लिम समाजातील लहान १६ ते १७ वर्ष वयोगटातील मुलगा आहे, आई मोळ्या विकून घर चालवते, तर वडील मोलमजुरी करतात, ईला ला नवीन कपडे फक्त वर्षातून एकदाच तेही रमजान ईदलाच मिळत असत, भोकर च्या डॉ, आंबेडकर चौकात मिळेल त्या हॉटेलात ईला काम करत असत, हासरा स्वभाव असल्याने तो सर्वांना आवडायचा, कोणी लाडाने त्यास मारतही असत, पण ईला ने कधी कोणाकडे त्याची तक्रार केली नाही, सर्वांचा तो आदर सन्मान करायचा याच त्याच्या स्वभावाने आज तो सर्वांचा लाडका दादा झाला होता.
म्हणून भोकर शहरातील नागरिकांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते, मागील चार दिवसांपासून ईला शोषल मीडियावर झळकत होता, फेसबुकवर तर त्याचे अनेकजण फॅन झाले होते, शुक्रवारी त्याचा वाढदिवस होता पन चार दिवस पूर्वीपासूनच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता, त्यामुळे त्यास तालुक्यातील व तालुक्याबाहेरील नागरिक ओळखू लागले होते, अखेर शुक्रवार दि,१४ डिसेंबर २०१८ रोजी त्याचा वाढदिवस आला आणि सारे गाव त्याच्या वाढदिसाच्या तयारीला लागले होते, सजवलेल्या गाडीवर त्यास बसवून ढोल ताशाच्या गजरात त्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, प्रत्येक समाजाचा नागरिक त्याच्या मिरवणुकीत सामील झाला होता, जो तो नागरिक त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धडपडत होता,कोणी मिरवणुकीची शूटिंग करण्यात मग्न होता, जवळपास पाच ते सहा हजार नागरिक त्याच्या मिरवणुकीत सामील झाले होते, चौका चौकात त्याच्या वाढदिवसाचे केक कापले जात होते, सगळीकडे आंनदी वातावरण निर्माण झाले होते, मिरवणुकीतील नागरिक आणि मिरवणूक पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर हासू फुलले होते, ही मिरवणूक जवळपास तीन तास चालली शेवटी भोकरच्या डॉ, आंबेडकर चौकात हजारो नागरिकांच्या साक्षीने ईला दादा च्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
भोकरच्या इतिहासातील पहिला भव्य वाढदिवस
ईला दादा च्या रूपाने का होईना नागरिकांनी त्याचा भव्यदिव्य वाढदिवस साजरा करून भोकर च्या इतिहासात प्रथमच या वाढदिवसाची नोंद केली.
भोकरच्या गल्लीबोळात दादा ची पैदास
भोकर शहरात जागोजाग पोष्टर बाजी करून कोणीहि दादा होत आहेत, कोणीही उठसुठ वाढदिवसाचे बॅनर लावून भोकरचा चौक विद्रुप करत आहेत, आणि हे पोष्टर कितीही दिवस शहरात लटकून रहात असल्याने शहराचे सौंदर्य लोप पावत आहे, यावर नगरपरिषदेचे काहीच निर्बंध नाहीत, त्यामुळे भोकरची जनता ईला ला "ईला दादा" करून उपहासात्मक हा वाढदिवस साजरा केला असल्याची चर्चा आहे.
""""''''''''''''''''''''''''""''''''''''''''''''
ईला दादा ला ,,,ई पेपर भोकर न्युज लाईव्ह चे संपादक आणि परिवारा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,,,🎂🎂🎂🎂💐💐
""""""""""""""""""""""""""""""""""

0 Comments