भोकर :(रमेश गंगासागरे) दिनांक ०८ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा सत्र न्यायालय भोकर येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात प्रलंबीत आसलेली २५० प्रकरणे ठेवण्यात आली होती. दाखलपूर्ण प्रकरणे २३०० पेक्षा जास्त ठेवण्यात आली होती. ज्यामध्ये विज महावितरण कंपनी, भारतीय स्टेट बँक भोकर, महाराष्ट्र ग्रामिण बँक, देना बँक अदिसह विविध बँकाचे थकीत कर्ज प्रकरण प्रलंबीत होते या सर्व प्रकरणापैफी आज २५० प्रकरणापैकी ५१ प्रकरणे समोपचाराने व तडजोडीने मिटवण्यात आली त्यात ६७ लाख ७१ हजार एवढया रकमेची वसूलीसाठी अॅवार्ड पास करण्यात आले. यामध्ये पोटगी , व कौौौटुंबिक वाद या मधील राजमणी विठठल पॅरमवाड व विठ्ठल पोशट्टी पॅरमवाड रा , सावरगाव मेट ता भोकर येथील या जोडप्याचा कौठोंबिक वाद संपूस्टात आणून दोघात समझौता करुन त्यांचा साडी चोळीने आहेर करुन पुर्ववत संसार करण्यास पाठविण्यात आले. दखलपूर्व २३०० प्रकरणात बँका, विज वितरण कंपनी, दुरध्वनी विभाग, यात ४० लाख ३१ हजार ४५२ एवढ़या रकमेच्या वसूलीचे अॅवार्ड पास करण्यात आले असे एकूण ३९० प्रकरणे आज निकाली काढण्यात आली आहेत, यामध्ये एकूण १,०८,०२,४५२ एवढ्या रकमेची वसूलीसाठी अॅवार्ड पास करण्यात आले.

0 Comments