भोकर:(रमेश गंगासागरे)  हिंदू देवी देवतांच्या प्रतिमेची विटंबना करून तसेच त्या बाबदचे चित्रीकरण फेसबुक वर अपलोड करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या बद्दल भोकर तालुक्यातील दोघा नास्तिका विरोधात भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       पोलिसांकडून मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी माधव बाबू कटेवाड राहणार कांडली तालुका भोकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सिद्धार्थ मारोती सोनकांबळे आणि साहेबराव मारोती सोनकांबळे दोघे राहणार सावरगाव तालुका भोकर यांनी हनुमान, गणपती आणि देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे विटंबना तर केलीच शिवाय विटंबना करताना त्या बाबदचे व्हिडीओ चित्रीकरण सुद्धा केले आणि हे चित्रीकरण शोषल मीडिया फेसबुकवर अपलोड करून सार्वजनिक केले, या आशयाची फिर्याद दिल्यावरून भोकर पोलिसांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या बाबद कलम २९५ नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक आर.एस. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चव्हाण हे करत आहेत.