भोकर : (रमेश गंगासागरे) मागील दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पारा घसरून थँडीत मोठी वाढ झाली होती, तर आज दि, १७ डिसेंबर रोजी सकाळपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने थँडीत कमालीची वाढ झाली, त्यामुळे अनेक नागरिक शेकोटीचा आधार घेतांना दिसून येत होते, सकाळी सर्वत्र धुके दाटले होते, त्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक,महिला जाड्या भरड्या मफलर,स्वेटर मध्ये वावरतांना दिसून येत होते.
अनेक शाळकरी मुले शाळेला न जाता घरीच राहणे पसंत केले आहे, वातावरणातील शितलहरी मध्ये दुपारनंतर वाढ झाल्याचे जाणवले त्यामुळे अनेकजण घरातच रहाणे पसंत केले आहे, बाजारपेठेत फेरफटका मारला असता या शितलहरीचा व्यापाऱ्यावरही मोठा परिणाम झाल्याचे जाणवले,दुपार पर्यंत अनेकांच्या भवण्या ही झाल्या नव्हत्या,
आणखी २ दिवस वातावरणात अशीच शितलहर राहणार असल्याचे अनेक जाणकार नागरिक बोलत आहेत.

0 Comments