भोकर:(रमेश गंगासागरे) भोकर शहरात मागील अनेक महिन्यापासून शहरात अनेक अवैद्य व्यवसाय चालू असून यात आता गुडगुडीच्या अवैद्य धंद्याने भर टाकली आहे, त्यामुळे अनेक तरुण आणि मोलमजुरी करणारे नागरिक व्यसनाधीन बनत चालले आहेत, म्हणून शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग वर्षेवार यांनीच या गुडगुडीच्या व्यवसायाचा भांडाफोड केला असून त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये या व्यवसायाचे चित्रीकरण ही केले आहे, त्यांनी पोलिस निरीक्षक भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.३ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १  दरम्यान डॉक्टर आंबेडकर चौकातील कॉम्प्लेक्स मध्ये खुलेआम काहीजण गुडगुडीवर पैसे लावून नागरिकांची लूट करत होते, त्याचवेळी वर्षेवार काही सेनेच्या कार्यकर्त्यासह तिथे हाजर झाले, त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले, काही अवैद्य व्यवसाईकांनी त्यांना विरोधही केला त्यावेळी काहीजण त्यांच्या अंगावर धावून आल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, निवेदनात पुढे म्हटले आहे की, या अवैद्य व्यवसाईकांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे, निवेदनात आणखी म्हटले आहे की, व्हिडीओ चित्रीकरणात दिसणाऱ्या सर्व अवैद्य चालकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून भोकर शहराची अवैद्य धंद्यातून मुक्ती करावी असें नमूद केले आहे. या देण्यात आलेल्या निवेदनावेळी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, माधव पा.वडगावकर, बाजार समितीचे संचालक सुनिल चव्हाण,  प्रदीप दोलतदार, हनमंत पा. कामनगावकर, चंदु बरबडेकर,  वैभव धोंडगे, दीपक वर्षेवार यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.