भोकर :( रमेश गंगासागरे) तालुक्यातील हाळदा येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भोकर तालुक्यातही उपविभागीय अधिकारी पवन चांडक व तसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हाळदा येथे प्रात्यक्षिक जनजागृती करण्यात आली.
     यावेळी नायब तहसीलदार स्वप्नील जगताप, मंडळाधिकारी अब्दुल लतीफ अब्दुल मजीद, तलाठी पि.पी. कापसे मॅडम, तलाठी राजू चव्हाण, मास्टर ट्रेनर पंडित घोडके यांच्या पथकाने ईव्हीएम - व्हीव्हीपॉट जोडून गावकर्यां समक्ष मतदान डेमो दाखवला. आपण ज्या चिन्हावर मतदान करतो त्यालाच मतदान होते त्याची प्रिंट मशीन मध्ये दाखवते. याची सविस्तर माहिती नायबतहसिलदार स्वप्नील जगताप यांनी उपस्थितांना दिली. यावेळी ६० नागरिकाकडून मतदान करून घेण्यात आले. त्यानंतर निकाल पण दाखवण्यात येऊन बायलट पेपरची प्रत्यक्षात मोजणी करून दाखवण्यात आली. यामध्ये सरपंच प्रतिनिधी साईनाथ याटेवाड, माजी सरपंच पत्रकार बालाजी नार्लेवाड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भुजंगराव भोसले, चेअरमन दत्तात्रय आक्कलवाड, मधुकर किसवे, आनंद भोसले, ज्ञानेश्वर बोईनवाड, गणेश आरलवाड, विठ्ठल आमेटवाड, शिवाजी नार्लेवाड आदीसह अनेकांची उपस्थिती होती.