भोकर :-(रमेश गंगासागरे) तालुक्यातील मातुळ येथील शेतकरी गणपत पिराजी उदगीरे यांचा मुलगा नामे सयाजी याचा गावातीलच काही जनांनी खून केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, त्यानुसार आरोपीवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मयत सयाजीचे माता, पिता यांनी भोकर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापुढे दोन दिवसापासून कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषणस बसले आहेत.
       उपविभागीय अधिकारी भोकर यांना उदगिरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचा मुलगा सयाजी उदगिरे वय २३ वर्षे हा दिनांक २७/९/२०१८ रोजी शेताकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता, परंतु तो घरी आलाच नाही त्यामुळे त्यांचा गावात व नातेवाईकाकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही, शेवटी दिनांक २९/९/२०१८ रोजी भोकर ठाण्यात तक्रार दिली, काही दिवसांनी दि,१/१०/२०१८ रोजी मातुळ पासून ३किलोमीटर अंतरावर नदीकाठच्या झाडीत त्याचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यावरून आता त्याचा खून झाल्याचे दिसून आले, म्हणून पोलिसांनी तात्काळ अर्जात नमूद केलेल्या आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
       सदरील उपोषणाचा आज दिनांक २९ डिसेंबर रोजी दुसरा दिवस असून कडाक्याच्या थंडीत वृद्ध दांपत्य उपोषणाला बसल्याने त्यांच्या मागणीचा आस्थेवाईकपणे विचार करावा अशी मागणी होत आहे.