भोकर : (रमेश गंगासागरे) नुकत्याच जिल्हयातील भारीप बहुजन महासंघाच्या शाखा घोषित झाल्या असून भोकर तालुका कार्यकारणी नांदेड जिल्हा अध्यक्ष मोहन राठोड, जिल्हा महासचिव श्याम कांबळे , जिल्हा संघटक दिपक कसबे यांनी गठित केली त्यामध्ये भोकर तालुका अध्यक्षपदी सुभाष तेले तर महाासचिवपदी सुनील कांबळे यांच्या निवडीचे पत्र दिले आहे.                                                                       येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय आध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून  संपूर्ण महाराष्ट्रात  पूर्नबांधणी करण्यात येत आहे. नांदेड जिल्हयातील बहुतांश तालुक्यात पक्षाची नूतन पूर्नबांधणी करून कार्यकारिणी घोषीत करण्यात आल्या मात्र भोकर  येथील कार्यकर्त्याच्या  हेव्या दाव्यामूळे पदाधिकाऱ्यांची  निवड प्रक्रीया बारगळली होती, या संदर्भात लोकांत प्रचंड असंतोष  व्यक्त होत होत असताना अखेर आज भोकर तालुका कार्यकारिणीला मुहूर्त सापडला असून  जिल्हा आध्यक्ष मोहन राठोड , महासचिव श्याम कांबळे, संघटक दिपक कसबे आदी जिल्हयाच्या पक्षश्रेष्ठीकडून  भोकर तालुका कार्यकारिणी कमेटी  घोषीत करण्यात आली आहे. यामुळे निवडीकडे लक्ष लागून आसलेल्या कार्यकर्त्यांचा जीव भांडयात पडला आहे. जिल्हा कार्यकारिणी कडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे घोषीत करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.तालुकाध्यक्ष -सुभाष तेले, तालुका महासचिव सुनिल कांबळे, ता. ऊपाध्यक्ष -दत्ता भाऊ डोंगरे, सचिव -सोमेश फुगले, संघटक- आनंद एडके, सहसचिव -शंकर जिंकलवाड, कोषाध्यक्ष -राहुल एडके,प्रवक्ता-दशरथ भदरगे, सल्लागार -भिमराव दुधारे आदीची निवड केल्याचे नियुक्ती पत्र दिले तालुक्यातील बहुजन युवकांची फळी भारीपच्या पाठी मागे  जात असल्याने  तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसेल असे राजकिय वर्तुळात बोलल्या जात आहे या निवडीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.