भोकर :- (रमेश गंगासागरे) भोकर पंचायत समिती मध्ये दिनांक २८ आणि २९ डिसेंबर रोजी दुष्काळातून समृद्धीकडे - जलसंधारण ते मनसंधारण या विषयावर मोफत भव्य चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र भरात बिकट झालेला पानीप्रश्न सोडवण्यची क्षमता नागरिकांमध्येच आहे, नागरिकांच्या या ताकदीला जागृत करून या विषयातील विज्ञानाने नागरिकाना प्रशिक्षित करण्यासाठी अभिनेता अमिरखान यांनी सण २०१६ मध्ये पनिफाउडेशन मृद व जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध उत्तम कामगिरी करण्यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात येते, तसेच निवड झालेल्या तालुक्यातील गावामध्ये ही वाटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येते पुढील वर्षी सण २०१९ साठी भोकर तालुक्याची याही वर्षी निवड करण्यात आली आहे मागील वर्षी आपल्या तालुक्यातील अनेक गावांनी या स्पर्धेत भाग घेऊन मृद्ध व जल संधारणाची कामे केली यामुळे त्यांना भरघोस बक्षिसे तर मिळालीच आहेत, त्यानी केलेल्या श्रमदानामुळे ही गावे पाणीदार होण्यास मदत झाली आहेत, आता येत्या २८ ते २९ डिसेंबर २०१८ रोजी भोकर येथील पंचायत समिती कार्यालय येते सकाळी १० ते सायंकाळी भव्य चित्र प्रदर्शन आयोजित केले असून नागरीकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक आणि मराठवाडा विभागीय समणवयक संतोष शिनगारे आणि भागवत कोटकर यांनी केले आहे.

0 Comments