भोकर : (रमेश गंगासागरे) येथील शाहू शाळेतील मोठी विद्यार्थी संख्या आणि मोठ्या संख्येने असलेले शिक्षक पाहून मी थक्क झालो आहे, आज पर्यंत मी शाहूंचे नाव ऐकून होतो, यापूर्वी भोकर ला येण्याचा योग आला नाही, पण आज इथे येऊन एवढे शांत आणि संयमी विद्यार्थी पाहून मी थक्क झालो असे उदगार जेष्ठ हास्य कवी मिर्झा बेग यांनी   युवकांचे ह्रदयस्थान श्री, शिरीष भाऊ गोरठेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भोकर च्या शाहूमहाराज विद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.
         या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील घंटलवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष दत्तात्रेय पांचाळ, गोरठ्याचे सरपंच, कैलास भाऊ गोरठेकर, अभिषेक भाऊ, रामलू पाटील, कोकणे काका, चंद्रकलाबाई गायकवाड, माजी नगरसेवक जवाजोद्दीन बरबडेकर, डॉ, ईनामदार, नगरसेवक तोफिक ईनामदार, नगरसेवक वकील भाई, यांच्यासह अनेक पत्रकारांची प्रामुख्याने उपस्थिती होती, कार्यक्रमात सत्कारमूर्ती शिरीष भाऊ गोरठेकर यांच्या वाढ दिवसाचा केक कापून त्यांचा येथील शिक्षकांच्या वतीने भव्य हार घालून सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमात माधव बोंपिलवाड या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलांना शिरीष भाऊ गोरठेकरांच्या हास्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, मिर्झा बेग पुढे बोलतांना म्हणाले की, गोरठेकर साहेबांनी शाहू सारख्या लावलेल्या झाडाला आज सुंदर फळे येत आहेत, इथला रिझल्ट्स पण खूप लागतो आहे, हे पाहून गोरठेकर साहेबांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, असे ते म्हणाले कार्यक्रमात मिर्झाबेग यांनी एका पेक्षा एक सरस हास्य कविता,देशभक्ती पर चुटकुले सांगून आणि जोक्स सांगून २ तास सर्वांना हसवत ठेवले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वानखेडे सर यांनी केले तर आभार प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर यांनी मानले, कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले होते, हा कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख सलीम सर,यांनी आणि असंख्य सहशिक्षकांनी मेहनत घेतली होती.