भोकर :(रमेश गंगासागरे) दीन दयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत भोकर नगरपालिकेत दिव्यांगाना २ लाख ९७ हजाराचा निधी वाटप करण्यात आला आहे.
शनिवारी नगरपालीकेत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष गोविंद पाटील गौड हे होते. तर उपनगराध्यक्ष प्रतिनिधी
शेख युसूफ, मुख्याधिकारी नितीन बागूल, नगरसेवक
मनोज गिमेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीन दयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील १३७ दिव्यांना २ लाख ९७ हजार तर ९ बचत गटांना फिरता निधी ९० हजार वाटप करण्यात आला. दिव्यांगांनी शासनाच्या विविध योजनेची माहीती घेवून लाभ घ्यावा , कुणी वंचीत राहू नये, असे आव्हान उपस्थित मान्यवरांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनिल कल्याणकर यांनी केले. यावेळी साहेबराव मोरे, अशोक भोसले, इम्रान इनामदार, शेख मुख्तार आदी न. प. कर्मचाऱ्यांसह , दिव्यांग, बचत गटाच्या महीला मोठया संख्येने उपस्थित होत्या. निधी मिळाल्याने दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

0 Comments