भोकर :(रमेश गंगासागरे) आज दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान शहरातील मुख्य रस्त्याने जलद कृती दल (आर.ए.एफ.),केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स आणि भोकर पोलीस यांनी संयुक्तपणे पथसंचलन केले.
        पथसंचलन दरम्यान आयोजित कार्यक्रमात आर.ए. एफ.चे असिस्टंट कमांडर संतोष कुमार यांनी सांगितले की, भोकर शहरातच काय देशात कुठेही दंगे होत असल्यास किंवा होण्याची शक्यता असल्यास आम्ही फक्त ५० मिनिटात त्या ठिकाणी हजर होऊन दंगा नियंत्रणात आणत असतो, वेळ प्रसंगी परिस्थिती पाहून आमच्या परीने परिस्थिती वर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाय करत असतो, असे ते म्हणाले, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी देशपांडे, पोलीस निरीक्षक आर.एस. पडवळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पडवळ यांनी केले तर आभार सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी मानले.कार्यक्रमास भोकर येथील असंख्य नागरिक उपस्थित होते.