भोकर :(रमेश गंगासागरे) येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने गत वर्षी उत्कृष्ट प्राचार्याचा पुरस्कार प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांना दिला तर यावर्षीचा उत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालयाचा पुरस्कार महाविद्यालयास दिला.सदरील पुरस्कार  झी 24 तास चे संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते आणि नूतन कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या 24 व्या विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात रोख 25000 रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.                                         महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून माजी मंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांनी प्राध्यापक कर्मचारी यांच्या सोबतीने अनेक नवनाविन शैक्षणिक उपक्रम राबवले त्यामध्ये नियमित नॅक प्रक्रिया पार पाडणे, भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविताना पदव्युत्तर शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे , विज्ञानशाखेसाठो नावीन्यपूर्ण विषय सुरू करणे, विद्यार्थ्यांना खेळासाठी  इनडोअर आणि आऊट डोअर सुविधा उपलब्ध करून देणे,मुलींसाठी वसतिगृह उभारणे,ग्रंथालयासाठी मोठ्या प्रमाणात ग्रंथ उपलब्ध करून देणे, स्मार्ट क्लासरूम उपलब्ध करून देणे, उत्कृष्ट परीक्षा निकाल,राष्ट्रीय चर्चासत्र,वर्कशॉपचे आयोजन करणे ,स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणे,राष्ट्रीय सेवा योजनांच्या माध्यमातून विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबविण्यात आले,तसेच आंतर महाविद्यालयीन तसेच विद्यापीठस्तरावर खो खो,कबड्डी, बॅडमिंटण, बुद्धिबळ,मैदानी स्पर्धा यासारख्या खेळांत विद्यार्थ्यांनी मिळविलेले प्राविण्य,सांस्कृतिक स्पर्धामध्ये विध्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मिळवलेले प्राविण्य,यासह अनेक क्षेत्रात महाविद्यालयाने आपला विद्यापीठात वेगळा ठसा उंमटविल्याने विद्यापीठाने बिंदू महाविद्यालयास उत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय म्हणुन गौरविंकीत केले आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ माधवराव पाटील किन्हाळकर,सचीव मुरादसाब मांजरमकर,डॉ वृषाली किन्हाळकर,यासह अनेक मान्यवरांनी आनंद व्यक्त करून प्राचार्य,प्राध्यापक, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे .