भोकर (रमेश गंगासागरे) येथील शाहु महाराज विद्यालय येथे ,आज ( ता.११ ) गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने अयोजीत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अयोजन करण्यात आले असून त्यास बालवैज्ञानिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शाळेतील विदयार्थ्यात बालवयापासूनच वैज्ञानिक जिज्ञासा वृध्दींगत व्हावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी शासनाच्या शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय बाल शास्त्रज्ञांचा विज्ञान मेळावा अयोजीत करण्यात येतो. या वर्षी शाहूविदयालयात अयोजीत विज्ञान मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून वर्ग प्राथमिक गटातून २० तर माध्यमिक गटातील २३ प्रयोगांनी यात सहभाग नोंदवला होता .
अयोजीत विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी डी.जी. पोहणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार आर.एल. मुधोळकर, शिक्षण विस्तार अधिकारी डी.डी. सुपे. शाहु विद्यालयाचे सलीम शेख , एस.जी.कुलकर्णी , शिक्षण विभागाचे सुधांशु कांबळे, डेव्हीड ग्रॅहम्बल , अदींची ऊपस्थित होती. सदर विज्ञान मेळाव्यात बालवैज्ञानिकांनी विविध समाजपयोगी विज्ञानाचे सादरीकरण करुन आपले कसब सिध्द केले. पर्यवेक्षक म्हणून जि.प. हायस्कूलचे विज्ञान शिक्षक सौ. आर.के. रॅपतवार, मंजूळाबाई किन्हाळकर विदयालयाचे सौ. व्ही.बी. कुंभरे, शाहु विदयालयाचे एस.जी. कुलकर्णी आदींनी काम पाहिले. सदरील विज्ञान प्रदर्शनास विज्ञानप्रिय नागरिक व विविध शाळेच्या विद्यार्थांनी भेट देऊन, समाधान व्यक्त केले. अयोजीत विज्ञानप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाहु विदयालयाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

0 Comments