भोकर: (रमेश गंगासागरे) येथील तहसील कार्यालय येथे आज दि. 3 डिसेंबर अपंगदिना निमित्त नवमतदाराचे व अपंग मतदाराचे मा.तहसिलदार श्री मुंडे साहेब ,नायब तहसीलदार श्री.कामठेकर साहेब यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करून सर्व  उपस्थित अपंगांना मार्गदर्शन केले तसेच अपंगांसाठीच्या निवडणूक आयोगाने राबविलेल्या सोइसुविधा बाबत तसेच शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली.सदर कार्यक्रम मा.तहसीलदार भोकर श्री मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न झाला असून कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री कामठेकर साहेब निवडणूक,अ का,श्री विशाल चौधरी,लिपिक डी. जी.गादिलवाड,संजय सूर्यवंशी संगणक चालक व प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री.ढगे पाटील एच.एस.,शहर अध्यक्ष गणेश घिसेवाड, सचिव बालाजी कोकणे,राजू खुणे जिल्हा संपर्कप्रमुख अपंग संघटना,श्रीमती अनुसयाबाई जाधव इत्यादी अपंग संघटना  पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात अपंग मतदारांची उपस्थिती होती.