भोकर :(रमेश गंगासागरे) अनेक दिवसांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी भोकर येथील नगरपरिषदेचे कर्मचारी मागण्या मान्य न झाल्यास नवीन वर्षाच्या सुरुवाती पासून बेमुद्दत काम बंद आंदोलन करणार असल्याचे लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष संभाजी वाघमारे यांनी मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना आज दि.१३ डिसेंबर रोजी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेत काम करत असलेले रोजनदारी कर्मचारी, अनुकंपाधारक कर्मचारी, सफाई कामगार, संवर्ग कर्मचारी यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून शाषणाकडे प्रलंबित आहेत, त्यामागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने दिनांक १जानेवारी २०१९ पासून बेमुद्दत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र सर्व वरिष्ठांना देण्यात आले आहे.

0 Comments