अर्धापुर :(रमेश गंगासागरे) नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बु) येथे अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेची स्थापना संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
             युवा नेते हणमंत उतकर सगरोळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत सविस्तर चर्चा करुन समता परिषदेची स्थापना करण्यात आली. अन्याय अत्याचारांचा मुकाबला आणि समाजाचा सर्वांगीण विकास यासाठी सामाजिक संघटनेचे महत्त्व आणि कार्य चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी यावेळी विषद केले.
          यावेळी सर्वानुमते पुढीलप्रमाणे शेलगाव शाखेची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष - राम परसराम अन्नपूर्णे, उपाध्यक्ष - आत्माराम दत्ता अन्नपूर्णे, सचिव - लक्ष्मण परसराम अन्नपूर्णे, सहसचिव - माधव पिराजी अन्नपूर्णे, कोषाध्यक्ष - रुखमाजी संभाजी अन्नपूर्णे, सहकोषाध्यक्ष - विठ्ठल पिराजी अन्नपूर्णे, संघटक - ज्ञानेश्वर चांदू वाघमारे, सहसंघटक - संतोष लिंबाजी गायकवाड.

                     महिला आघाडीची स्थापना
           ==========================
 अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या महिला आघाडीची स्थापना यावेळी करण्यात आली. अध्यक्षा - गंगाबाई माधवराव अन्नपूर्णे, उपाध्यक्षा - सुमनबाई दत्ता अन्नपूर्णे, सचिव - अनिता बालाजी कांबळे, सहसचिव - उज्वला राम अन्नपूर्णे, कोषाध्यक्षा - पार्वतीबाई रुखमाजी अन्नपूर्णे, सहकोषाध्यक्षा - रंजना लक्ष्मण अन्नपूर्णे, संघटिका - राधाबाई परसराम अन्नपूर्णे, सहसंघटिका - अंजनाबई विठ्ठल अन्नपूर्णे.
           सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थापक अध्यक्षांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. लवकरच समता परिषदेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.