भोकर :(रमेश गंगासागरे) भोकर येथे नव्यानेच राजू झालेले कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी कोळगाव येथील शेतकऱ्याची चोरी गेलेली बैल जोडी अवघ्या काही तासातच शोधून देऊन आपल्या कर्तव्य तत्परतेचे उदाहरण दिले आहे.
घटनेची थोडक्यात माहिती अशी की,मागील दोन वर्षांपूर्वी भोकर ठाण्यात आपल्या वेगळ्या कार्याने भोकर वाशीयांची मने जिंकलेले आणि अवैध धंदे वाल्यांचा कर्दनकाळ म्हणून सर्वानाच परिचित असलेले जेष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी भोकर ठाण्याचा पदभार घेताच चौकात वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम केले, तसेच परवा लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी भोकर तालुक्यातील शेतकरी नामे,गणेश बापूराव सुर्यवंशी यांच्या शेतातील आखाड्यावरून त्यांची बैल जोडी चोरीला गेली होती, आधीच शेतीने दगा दिल्याने हताश झालेल्या गणेशरावानी पोलिस निरीक्षक चौधरी यांच्याकडे सर्व हकीकत सांगितली, त्यावर चौधरी यांनी आपल्या दिर्घ अनुभवाने बैलजोडी शोधण्यासाठी एका टीमची नियुक्ती केली, ह्या टीमला बैलजोडी परळी येथे असल्याचा सुगावा लागला, टिमच्या साह्याने परळी तालुक्यातील हळंब येथे जाऊन बैल चोरास जेरबंद केले , त्याची विचारपूस केली असता, तो मुदखेड तालुक्यातील डोंनगाव येथील असल्याचे सांगितले, तसेच त्याने ही बैलजोडी ७० हजार रूपयास विक्री केल्याचेही सांगितले त्यावरून त्यास तात्काळ अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, बैलजोडी भोकर ठाण्यात आणल्यानंतर बैल पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती, चौधरी साहेबामुळेच आम्हास बैल जोडी मिळाल्याचे मत शेतकरी सुर्यवंशी यांनी पत्रकार रमेश गंगासागरे यांच्याशी बोलताना सांगितले आहे.
ह्या टीम मध्ये पोलिस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक श्री, भाले,कृष्णा तलवारे, बिट जमादार जाधव, आणि राठोड यांनी काम केले असून यांचे सर्व स्थरारून अभिनंदन होत आहे.

0 Comments