भोकर:(रमेश गंगासागरे) मागील अनेकवर्षांपासून वाहतुकीला व नागरिकांना अडचणींचा ठरलेला व येथील डॉ. आंबेडकर चौकातून किनवटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्हीं बाजूचे अतिक्रमण काढण्यास विशेष प्रकल्पच्या अधिकाऱ्यानी आज दुपारी सुरुवात केली.
      किनवटरोड वरील व्यापाऱ्यानी केलेल्या अतिक्रमना बाबद मागील काही वर्षांपासून असंख्य तक्रारी वाढल्या होत्या, ह्या रस्त्यावरून नागरिकांना, विद्यार्थ्यांना, रस्त्यावरून चालणे जिकरीचे झाले होते, काही दिवसांपूर्वी शाहू महाराज विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरून उपविभागीय अधिकाऱ्याना हा रस्ता वाहतुकीला मोकळा करावा यासाठी निवेदन दिले होते, पण काही फारसा फरक पडला नाही, आता किनवट रोडचे रुंदीकरण चालू असून रस्ता मजबुतीचे काम प्रगती पथावर चालू करण्यात आले आहे, त्यामुळे नाईलाजाने विशेष प्रकल्पाच्या अधिकाऱ्याना जेसीबीच्या साह्याने नालीच्या अलीकडील सर्व अतिक्रमण काढन्यास सुरुवात केल्याने येथील अतिक्रमण धारक व्यापाऱ्यात मोठी धावपळ झाली आहे.
        हा रस्ता आता अतिक्रमण मुक्त होत असल्याने पूर्णरूपाने मोकळा श्वास घेताना दिसून येत आहे.